Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

📰 होटगी ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा?; निधी हडपल्याचा आरोप, चौकशीची मागणी तीव्र


 प्रतिनिधी...मनोज जाधव 


📰 होटगी ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा?; निधी हडपल्याचा आरोप, चौकशीची मागणी तीव्र


सोलापूर (ता.१२ सप्टेंबर) – होटगी (ता. सोलापूर) ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा निधी हवेत गायब झाल्याचा सनसनाटी आरोप समोर आला आहे. विकासकामे झाली नसतानाही लाखोंची बिले फाडून निधी हडपल्याचा आरोप होत असून या गोंधळाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सम्राट मौर्य सेना संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राघवेंद्र चाबुकस्वार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.




शाळा इमारत, हँडपंप, बसस्टँड, बंधारे, रस्ते आदींसाठी २०१९ पासून वारंवार निधी दाखवला गेला. मात्र, प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. एवढेच नव्हे तर एका ठिकाणी 09 हॅण्डवॉश, तर दुसऱ्या ठिकाणी 09 मुतारी दाखवून खोट्या नोंदींमधून शासकीय निधीची लूट केल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.


ग्रामपंचायतीच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘लूटमार उद्योग’ तातडीने थांबवावा. चौकशी न झाल्यास जनआंदोलनाचा भडका उडेल,” असा इशारा चाबुकस्वार यांनी दिला आहे.


या घोटाळ्याच्या आरोपांमुळे होटगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या