Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर


 


       प्रतिनिधी...मनोज जाधव 


📰 राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर

आळंदी देवाची (पुणे) :
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत समाजसेवेची नवी दिशा दाखवणारे प्रशांत शशिकांत मते यांची यंदाच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 साठी निवड करण्यात आली आहे. हा मानाचा पुरस्कार शिवप्रतिष्ठान संस्था, साई पार्क सोसायटी, पद्मावती रोड, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.



पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धर्मशाळा, पद्मावती रोड, आळंदी देवाची, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मते यांना मानाचा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनजी रेनगडे पाटील यांनी दिली.

या जाहीरातीने सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रशांत मते यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण राज्यात होत असल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

👉 "महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार" हा समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा मानाचा सन्मान मानला जातो.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या