जयप्रकाश विद्यालयातील माजी विद्यार्थी अजिंक्य सुरवसे व ओम भोरे यांची भारतीय सेनेत निवड
प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर, दि. 27 नोव्हेंबर – जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी अजिंक्य सुरवसे व ओम भोरे यांची भारतीय आर्मीत निवड झाल्याने विद्यालयात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दोघांनीही इयत्ता पाचवीपासून जयप्रकाश विद्यालयात शिक्षण घेतले. लहानपणापासून देशसेवेची जिद्द बाळगून सातत्यपूर्ण परिश्रमांच्या जोरावर त्यांनी भारतीय सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले. कठोर मेहनत, चिकाटी आणि ध्येयवेड यामुळे यश सहज मिळवता येते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या कामगिरीतून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेत आपल्या ध्येयाकडे एकाग्रतेने वाटचाल करावी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास डॉ. आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाषदादा कोळगे, माजी जि. प. सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा. पं. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, आगतराव भोयटे, राजाराम कोळगे, माजी सरपंच बालाजी कोळगे, नवनाथ गव्हाणे, सुरज जाधव, पांडुरंग कोळगे, बाबासाहेब कोळगे, पांडुरंग आगळे, सौ. निलावती वडवले, नानासाहेब पवार, शशिकांत कोळगे, शाहूराज मते, दिलदार खोंदे, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन कांबळे यांनी केले, तर श्री. अभिजीत घोळवे यांनी आभार मानले.


0 टिप्पण्या