प्रतिनिधी...मनोज जाधव
📰 मराठा आरक्षणासाठी आंदोलकाचा फलक ठरला चर्चेचा विषय
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आजाद मैदानावर मोठा जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर एका आंदोलकाच्या हातातील फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
"मेगा आरक्षणाचे घोडे आडल्याय कुठे?" असा सवाल करणाऱ्या या फलकावर पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, सरपंच या सर्व पदांवर "भा.ज.पा" अशी नोंद करत थेट भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेले अनेक दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. या लढ्यात आता ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी, कामगार, तरुण मोठ्या संख्येने उतरले असून आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे.
मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांच्या घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी या आंदोलनातून पुढे येत आहे.
👉 आंदोलकाचा फलक सध्याच्या राजकीय घडामोडींवर थेट बोट ठेवणारा ठरला असून सामाजिक माध्यमांवर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
0 टिप्पण्या