📰 धाराशिव : बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांचा आज वाढदिवस....वाढदिवस विशेषांक व शुभेच्छा
धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश पाटील यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीला आळा घालून गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिक व गरजूंपर्यंत पोहोचवून समाजहिताची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
गुन्हेगारी कमी करण्यासोबतच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवात स्वतः सहभागी होत समाजामध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण केले आहे. सहकाऱ्यांचे मनोबल उंचावणे, नागरिकांचा विश्वास जिंकणे व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करणे यात पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारी, नागरिक व सामाजिक संस्थांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि कार्यक्षमता लाभावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
👉 " श्री. गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बेंबळी पोलीस स्टेशन" यांना मनोज जाधव मुख्य संपादक सत्यमेव जयते एक्सप्रेस न्युज चॅनल व सर्व टीमच्या वतीने वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
0 टिप्पण्या