जयप्रकाश विद्यालय देश पातळीवर चमकले : आमदार मा श्री राणादादा पाटील
प्रतिनिधी....मनोज जाधव
(संस्थेला सभागृहासाठी 50 लाख निधी उपलब्ध करून देणार )
रुईभर : दि 20 डिसेंबर रोजी : जीवनात परिश्रमाला महत्त्व दिले पाहिजे . आपल्या संस्थेतील या सत्कार सोहळ्यातून हेच सिद्ध होते की कष्ट करणे व त्यासाठी वेळ देऊनच आपण ध्येय साधू शकतो. आपण जे काम केले त्या कामाला जर कौतुकाची साथ भेटली तर काम करण्यास आणखी ऊर्जा येते. आई-वडिल, राज्य, राष्ट्राला विद्यार्थ्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतात. आपण जे काम करतो ते पूर्ण ताकतीने करावे. आपल्यातील क्षमता वाढवावी ही क्षमताच आपल्या कार्याला मूर्त रूप देत असते. चांगल्या कामाचे नक्कीच कौतुक होत असते. आपल्या संस्थेचे चालणारे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. हे करण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा केलेली असते. ग्रामीण भागातील संस्था असून देखील राष्ट्रीय पातळी पर्यंत जाऊन पोहोचते त्यामागे परिश्रमच असते.जयप्रकाश विद्यालय देश पातळीवर चमकले हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिश्रम करतो असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे आमदार मा श्री राणा दादा पाटील सत्कार समारंभ प्रसंगीआजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की आपल्या पाल्याने केलेल्या कार्याचा आई-वडिलांना फार अभिमान असतो. त्या पूर्ण करण्यासाठी श्रम महत्त्वाचे असतात. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे जे काम करतो ते परिपूर्ण करावे. यासाठी कष्ट मेहनत महत्त्वाचे आहे. आपल्या संस्थेला सभागृहासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन ही याप्रसंगी दिले.
शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांना दैनिक लोकमत आयकॉन धाराशिव 2025 तर्फे प्रतिष्ठेचा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला त्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील सुयश आडे याने मध्य प्रदेश राज्यातील देवास येथे झालेल्या नॅशनल क्रीडा स्पर्धा सॉफ्ट टेनिस खेळामध्ये सांघिक (महाराष्ट्र राज्य ) व वैयक्तिक गोल्ड मेडल असे दुहेरी यश संपादन केल्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघात राज्यस्तरीय डॉज बॉल स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कारमूर्ती डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे होते.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी प्रास्ताविक भाषण केले. याप्रसंगी बोलताना म्हणाले की विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळी पर्यंत यश संपादन केले. स्पर्धेच्या युगात कौशल्य दाखवून व मेहनत करून आपली ओळख निर्माण केली पाहिजे. समाजातील बदलाबरोबर बदलायचे असेल तर मेहनत आवश्यक आहे. दैनिक लोकमत आयकॉन पुरस्कार 2025 प्राप्त शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे, राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणारा सुयश आडे, तर राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मुलींच्या संघाचे ही कौतुक केले. संस्थेच्या सभागृहासाठी मदत देण्याची ही अपेक्षा या प्रसंगी त्यांनी केली.
याप्रसंगी नितीनजी काळे, भगवान आबा गिरी महाराज, रामदास अण्णा कोळगे, राजनारायण कोळगे, बालाजी कोळगे , प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके, शेषेराव जावळे पाटील, उत्तमराव लोमटे, शिवाजी बारगुळे , शिवाजी पवार, पोपट नलावडे, गणपत बप्पा माने, आगतराव भोईटे, सुब्राराव लोमटे, गोपाळ निंबाळकर, मारुती कस्पटे, राजाराम कोळगे, राजेंद्र गव्हाणे, अशोक सिरसाटे, सुनील भोईटे, शशिकांत कोळगे, शाहूराज मते, विठ्ठल कोळगे, धनाजी चव्हाण, सुरत जाधव, अमर भोईटे, बाबासाहेब कोळगे, पांडुरंग कोळगे, प्राचार्य संतोष कपाळे, मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे तर आभार श्री काकासाहेब डोंगरे यांनी मानले.


0 टिप्पण्या