प्रतिनिधी...मनोज जाधव
मनोज जरागे पाटील यांच्या आंदोलनाच्या पुढे अखेर सरकारची शरणागती....
मराठा आंदोलनाचा विजय – सरकारची शरणागती, आझाद मैदानावर जल्लोष
मुंबई :
मराठा समाजाचा पाच दिवसांचा अभूतपूर्व लढा अखेर फळाला आला आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील चार कोटी मराठा समाज मुंबईत ठामपणे उभा राहिला होता, तर उर्वरित तीन कोटी बांधव गावकुसातून या लढ्याची ताकद वाढवत होते. या प्रचंड दबावासमोर अखेर सरकारने शरणागती पत्करली आहे.
हैदराबाद उपसमितीने उपोषण स्थळी येऊन मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले की, "एक तासाच्या आत शासन आदेश काढला जाईल." यावर जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आदेश बाहेर आल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी केली जाईल.
दरम्यान, उर्वरित बॉम्बे गॅझेट व सातारा गॅझेट यासाठी एक महिन्याचा अवधी मागण्यात आला असून, त्यावरही सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे उपसमितीने कळवले आहे.
या घडामोडीनंतर आझाद मैदानावर उपस्थित लाखो आंदोलकांचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. ढोल-ताशे, घोषणाबाजी, जल्लोषाचा महापूर उसळत असून मराठा बांधवांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
👉 हा क्षण मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा परमोच्च टप्पा ठरला असून, "मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाने सरकारला झुकवले" अशी घोषणा ऐन मैदानावर घुमत आहे



0 टिप्पण्या