प्रतिनिधी....मनोज जाधव
📰 धाराशिव – सोलापूर जिल्ह्यांसाठी अमोल शिवाजी जगदाळे यांची जिल्हासंपर्क प्रमुखपदी नियुक्ती
प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांसाठी नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एमआयडीसी तेंभुर्णी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील अमोल शिवाजी जगदाळे यांची संपर्क प्रमुख जिल्हा धाराशिव व सोलापूर या पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीपत्राद्वारे पक्षाने स्पष्ट केले आहे की भारतीय संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही यांचा आदर्श ठेवून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार, आरोग्य, दिव्यांग व इतर सर्वांगीण विकासात्मक प्रगतीसाठी जगदाळे यांनी कार्यरत राहावे.
पक्षाच्या तत्त्वनिष्ठ व प्रामाणिक कार्यपद्धतीनुसार कोणताही मानमरातब, लाभ वा व्यक्तिगत स्वार्थ न पाहता समाजहित आणि जनहितासाठी निष्ठेने काम करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या नियुक्तीद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाला धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात नवी उभारी मिळणार असून पक्ष संघटन अधिक बळकट होणार आहे.
शेवटी, नियुक्तीपत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की अमोल जगदाळे यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे प्रामाणिकपणे पालन करून समाजातील वंचित, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार सातत्याने योगदान द्यावे.
✨त्यांना उत्कृष्ट राजकीय व सामाजिक कार्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख केदार सौदागर यांनी शुभेच्छा दिल्या
0 टिप्पण्या