*
प्रतिनिधी...मनोज जाधव
धाराशिव :- भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या वर जातीय मानसिकतेने राकेश किशोर नावाचा वकील धावुन गेला आणि तो पायातला बूट काढणार त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्याच्या दिशेने धावले आणि न्यायालयाबाहेर नेले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला. “सनातन का अपमान..नहीं सहेगा हिंदुस्तान…”अशा घोषणा या सडलेल्या मनुवादी वकिलाने यावेळी दिल्या..पाच हजार वर्षापासुनची गुलामगिरी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातुन मुक्त केली,त्याच संविधानानुसार सर्वांना अधिकार दिले असुन आज रोजी एका दलित कुटुंबातील बौध्द धम्मातील सरन्यायाधीश झाले आहेत आणि तेच अशा गंजलेल्या मनुवाद्यांना पचेनासे झाले आहे.सामाजिक समानता पाहता आजही या देशातुन जातीय वर्ण व्यवस्था गेली नसुन गोचिडासारखी या लोकांच्या मनात चिकटली आहे,देशाच्या सरन्यायाधीशांच्या बाबतीत असे कृत्य करणे म्हणजे देशद्रोहच आहे, या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि आपणास विनंती करतो की, राकेश किशोर याचे केवळ निलंबन न करता त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे,आणि भारताचे संविधान,सर्वोच्च पद,राष्ट्रध्वज, राष्ट्र चिन्ह,लोकशाही कोणाकडुनही बाधित झाले तर त्यासाठी तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.परत एकदा सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या बाबतीत झालेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतोत.यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे,राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे, सहसचिव संग्राम बनसोडे, सचिव प्रविण जगताप, उपाध्यक्ष संजय गजधने,बौध्दाचार्य व सदस्य धनंजय वाघमारे,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे, डॉ.रमेश कांबळे,नवनाथ वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,श्रीकांत मटकिवाले,बाळासाहेब माने,सह फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती, राजगिर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या