🔴 स्टेरॉईडच्या अतिरेकाने रुग्ण जीवघेण्या संकटात...
🏥 बनावट ‘एमबीबीएस’ डॉक्टरचा धक्कादायक प्रकार उघड – गंभीर गुन्हे दाखल
धाराशिव | प्रतिनिधी ...मनोज जाधव
धाराशिव तालुक्यातील रुईभर परिसरात वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली असून, उपचाराच्या नावाखाली रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैद्यकीय गरज नसताना अति प्रमाणात स्टेरॉईड इंजेक्शन देऊन रुग्णाला जीवघेण्या संकटात ढकलणाऱ्या खासगी डॉक्टरविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
---
⚠️ चुकीच्या इंजेक्शनमुळे रुग्णाची प्रकृती बिघडली
बेंबळी (ता. धाराशिव) येथील डॉ. सुधीर झिंगाडे यांनी रुग्ण आकाश चव्हाण यांना अनावश्यक व चुकीचे स्टेरॉईड इंजेक्शन दिले.
या इंजेक्शननंतर रुग्णाच्या संपूर्ण शरीराला तीव्र सूज, श्वासोच्छवासाचा त्रास व प्रकृती अत्यवस्थ झाली.
परिस्थिती हाताबाहेर गेल्याने रुग्णाला तत्काळ धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवावे लागले.
---
🔍 निगलिजन्स समितीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
तक्रार प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय निष्काळजीपणा (निगलिजन्स) समिती स्थापन करून सखोल चौकशी केली.
या चौकशीत संबंधित डॉक्टरने —
▪ वैद्यकीय नियमांचे उल्लंघन
▪ गरज नसताना स्टेरॉईडचा वापर
▪ रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण
केल्याचे स्पष्ट झाले.
❗ सर्वात धक्कादायक बाब म्हणजे —
संबंधित डॉक्टरकडे एमबीबीएसची पदवीच नसताना स्वतःला प्रिस्क्रिप्शनवर ‘MBBS’ म्हणून नमूद केल्याचे उघड झाले आहे.
---
🚨 FIR क्रमांक 0333 | गंभीर कलमे दाखल
निगलिजन्स समितीच्या अहवालानुसार बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0333 (वर्ष 2025) नोंद करण्यात आला आहे.
📜 दाखल कलमे —
🔹 भारतीय न्याय संहिता (BNS), 2023
▪ कलम 318(3) – फसवणूक
▪ कलम 336(3) – जीवितास धोका निर्माण करणारी कृती
▪ कलम 340(2) – चुकीच्या कृत्यामुळे गंभीर इजा
▪ कलम 125(a), 125(b) – सार्वजनिक आरोग्यास धोका
🔹 वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, 1961
▪ कलम 33(2)
▪ कलम 36
🔹 मुंबई नर्सिंग होम नोंदणी अधिनियम, 1949
▪ कलम 3
▪ कलम 6
---
❓ बोगस डॉक्टरांच्या मनमानीवर गंभीर प्रश्न
या घटनेमुळे खासगी वैद्यकीय क्षेत्रातील बोगस डॉक्टरांच्या साखळीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
फसव्या पदव्या, चुकीचे उपचार आणि पैशासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ — ही बाब समाजासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.
---
✊ नागरिकांची जोरदार मागणी
➡️ दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी
➡️ जिल्ह्यातील सर्व बोगस डॉक्टरांवर तपास मोहीम राबवावी
➡️ रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कायमस्वरूपी बंदी घालावी
अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक संघटना व आरोग्य क्षेत्रातून होत आहे.


0 टिप्पण्या