Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

युवा नेते मल्हार पाटील यांचा केशेगाव गटात मास्टरस्ट्रोक; भाजपचा ‘सामान्य कार्यकर्ता’ फॉर्म्युला ठरतोय गेमचेंजर!



सुमन प्रवीण भद्रे 

 
                                           

                                      बाबासाहेब जाधव 



युवा नेते मल्हार पाटील यांचा केशेगाव गटात मास्टरस्ट्रोक; भाजपचा ‘सामान्य कार्यकर्ता’ फॉर्म्युला ठरतोय गेमचेंजर!


धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केशेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीने घेतलेले निर्णय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. अल्पभूधारक शेतकरी, सर्वसामान्य पण कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देत भाजपने एक वेगळाच राजकीय आदर्श निर्माण केला असून या निर्णयामागे युवा नेते मल्हार पाटील यांचा निर्णायक वाटा असल्याची जोरदार चर्चा आहे.

केशेगाव गटातील करजखेडा पंचायत समिती गणातून भाजपचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब जाधव यांना उमेदवारी देत पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्याचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. भंडारी गावचे माजी सरपंच व सध्याचे विद्यमान सदस्य असलेल्या बाबासाहेब जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहत विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर भंडारी गावाला पुन्हा एकदा पंचायत समिती निवडणुकीत प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे.

१९९७ नंतर दुर्लक्षित राहिलेल्या या गावाला जिल्ह्याच्या नकाशावर पुन्हा ठळकपणे आणण्याचे काम बाबासाहेब जाधव यांनी आपल्या कार्याच्या जोरावर केले आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले भंडारी गाव त्यांनी राजकीयच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही नावारूपास आणले आहे. याच कामाची पावती म्हणून भाजपने त्यांना उमेदवारी दिली असून ही उमेदवारी म्हणजे विजयाकडे टाकलेले ठाम पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

याच केशेगाव गटात पाटोदा गावच्या सरपंच सुमन प्रवीण भद्रे यांना उमेदवारी देत भाजपने पुन्हा एकदा सर्वसामान्य, विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. प्रवीण भद्रे हे राजकारणातील ‘कोहिनूर हिरा’ म्हणून ओळखले जात असून सर्वसामान्य जनतेमध्ये ते “आपला माणूस” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची पद्धत, जनतेशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते मतदारसंघात लोकप्रिय ठरले आहेत.

बाबासाहेब जाधव आणि प्रवीण भद्रे हे दोन्ही उमेदवार आक्रमक, काम करणारे आणि विरोधकांना कडवी टक्कर देणारे असल्याने केशेगाव गटात भाजपचा ‘वरचा चष्मा’ नक्कीच चालणार, अशी चर्चा सध्या जनतेमध्ये जोर धरत आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचा भावनिक टच असलेला मतदारसंघ असून त्यांच्या विकासात्मक योगदानाची पावती आजही जनता देताना दिसते.

तसेच प्रवीण भद्रे हे आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या खास विश्वासातील मानले जात असल्याने या निवडणुकीत भाजपची ताकद अधिकच वाढली आहे. एकूणच, केशेगाव जिल्हा परिषद गटात भाजपने सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून राजकारणात नवा आदर्श निर्माण करत विरोधकांचे धाबे दणाणून सोडले असून येणाऱ्या काळात या मतदारसंघात भाजपचा दबदबा अधिकच वाढणार, हे निश्चितपणे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या