Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement


 बेंबळीतील प्रभाकर बोंदर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

विद्यार्थ्यांच्या नृत्य, नाटिका व सांस्कृतिक सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली; महिला दिनानिमित्त मान्यवर महिलांचा विशेष सत्कार...


बेंबळी (प्रतिनिधी) : मनोज जाधव 


बेंबळी येथील प्रभाकर बोंदर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक १० मार्च २०२६ रोजी इयत्ता ज्युनिअर केजी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कला, नृत्य, गायन, नाटिका आणि सांस्कृतिक गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच महान शिक्षणप्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कार, देशभक्तिपर गीते, सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद मिळाली.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. प्रभाकर बोंदर, संस्थापक अध्यक्ष श्री. भास्कर आबा बोंदर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. सुवर्णा फुलारी मॅडम, नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती सौ. गोखर्णा गोपाळ कदम, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सौ. संजीवनी अभिजीत पाटील, सौ. सुचिता प्रमोद पाटील, सौ. सरस्वती मोहन वाघुलकर, नवनिर्वाचित सदस्य लिंबराज भाऊ साळुंखे, भाजपा तालुका चिटणीस श्री. काका शेलार तसेच ‘सत्यमेव जयते’ चॅनलचे प्रतिनिधी श्री. मनोज जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच गावच्या सरपंच सौ. फातिमा सत्तार शेख यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती; मात्र काही अपरिहार्य कारणास्तव त्या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी दूरध्वनीद्वारे शाळा व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व मान्यवर महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील प्रत्येक वर्गातून एक महिला प्रतिनिधी निवडून त्यांना मंचावर मानाचे स्थान देण्यात आले, ही बाब कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. भाग्यश्री खापरे व सौ. अनुराधा लोहार मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष श्री. भास्कर आबा बोंदर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे संपूर्ण स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात आणि टाळ्यांच्या कडकडाटात संपन्न झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या