Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव, कळंब नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांची उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा


       

              प्रतिनिधी...मनोज जाधव 


धाराशिव, कळंब नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांची उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा


राज्यातील नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन धाराशिव आणि कळंब नगर परिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.


या बैठकीत जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका, स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण, शिवसैनिकांची भावना आणि अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी निवडणूक रणनीतीबाबत आवश्यक मार्गदर्शन करत पक्ष मजबूत करण्यासाठी पुढील नियोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.


दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या वाढलेल्या ताकदीचा धाराशिव आणि कळंब नगर परिषद निवडणुकीत निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी व्यक्त केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या