मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाचा निषेध – धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धाराशिव प्रतिनिधी : मनोज जाधव
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कार्यवाही करावी तसेच मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ Z+ सुरक्षा देण्यात यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना मराठा समाजातील नागरिकांचा प्रचंड संताप दिसून आला. हत्येच्या कटाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने ठोस पावलं उचलावी, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडून सरकारचा निषेध नोंदवू, असा इशाराही समाजबांधवांनी दिला.
समाजातील नेत्यांनी सांगितले की, आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा असून, त्यांना उच्चस्तरीय सुरक्षा मिळालीच पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाज सध्या आक्रमक असून, या प्रकरणी प्रशासनाने त्वरित आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.





0 टिप्पण्या