Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

*गड देवदरी येथे हजरत ख्वाजा शेख फरीद शकरगंज रहे दर्गा कमिटी तर्फे रक्त दान शिबिर संपन्न.. रक्तदान शिबीर आयोजकांना रुग्ण कल्याण व सुरक्षा समितीच्या वतीने शुभेच्छा*


     

              *गड देवदरी येथे हजरत ख्वाजा शेख फरीद शकरगंज रहे दर्गा कमिटी तर्फे रक्त दान शिबिर संपन्न.. रक्तदान शिबीर आयोजकांना रुग्ण कल्याण व सुरक्षा समितीच्या वतीने शुभेच्छा*

धाराशिव :- मौजे गडदेवदरी येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ हजरत ख्वाजा शेख फरीद शकरगंज रहे यांचा दर्गा असुन या दर्गा कमिटीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील रक्त पिढी संक्रमण विभागात रक्ताचा पुरवठा कमी असल्याने रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवच्या वतीने रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करावे असे आवाहन केले होते, याला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन रक्तदानासाठी समोर आले.अन्नपुर्णा सामाजिक संस्था,अभिराज राजाभाऊ कदम मित्रमंडळांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.रुग्ण कल्याणाच्या कार्यात सहभाग घेतल्याने रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समितीच्या वतीने सदस्य अब्दुल लतीफ,गणेश वाघमारे यांनी भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या उपक्रमातुन भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील संसद मधील भाषण असलेले पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.गडदेवदरी येथील रक्तदान शिबिराचे आयोजक मुजावर शौकत, मुजावर शब्बीर,मुजावर आजीम,तसेच प्रमुख उपस्थिती डिसीसी बॅंकेचे संचालक धाराशिव महेबुबपाशा पटेल व रामचंद्र पेंढारकर,शासकिय रक्तकेंद्र विभागाचे जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.विवेक कोळगे, सुपर वायझर विठ्ठल कांबळे, सुपर वायझर गणेश साळुंखे,निलाक्षी जानराव,दिप्ती बंकले,गणेश भालेराव,रविराज गंभिरे,आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या