मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ
शासन निर्णयामुळे ग्रामविकासाला गती;
प्रतिनिधी...मनोज जाधव
नागरिकांना मोठा दिलासा
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” योजनेस मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार या अभियानास 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून, सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. ग्रामपातळीवर पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना सक्षम बनवण्याचा शासनाचा उद्देश असून, गावांचा सर्वांगीण विकास साधण्यास या अभियानामुळे चालना मिळणार आहे. मुदतवाढ मिळाल्याने अद्याप लाभ न घेतलेल्या ग्रामपंचायतींना व नागरिकांना आता सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, अंतिम मुदत 31 मार्च 2026 असून त्या आतच संबंधितांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अंतिम टप्प्यात गर्दी टाळण्यासाठी व अडचणी येऊ नयेत यासाठी वेळेत अर्ज व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या या मुदतवाढीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळणार असून ग्रामीण महाराष्ट्र अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या