Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व : जिल्हा परिषद बेंबळी गटातून ‘बोंदर आबा’ इच्छुक


 जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व : जिल्हा परिषद बेंबळी गटातून ‘बोंदर आबा’ इच्छुक

बेंबळी | प्रतिनिधी.   मनोज जाधव 

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सहकार क्षेत्रात सातत्याने भरीव कार्य करणारे आणि संपूर्ण परिसरात ‘बोंदर आबा’ या नावाने परिचित असलेले भास्कर (आबा) बोंदर यांनी आगामी जिल्हा परिषद बेंबळी गट निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख असून, त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमान्य सहकारी पतसंस्था, प्रभाकर बोंदर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच श्रीराम मेडिकल यांच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी मजबूत व विश्वासार्ह जनसंपर्क निर्माण केला आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रातील त्यांचे कार्य थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भास्कर (आबा) बोंदर यांना अवघ्या ३५ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्या निवडणुकीत मिळालेला मोठा जनसमर्थन हा त्यांच्या लोकप्रियतेचा आणि जनतेच्या विश्वासाचा ठोस पुरावा ठरला. याच विश्वासाच्या बळावर ते नव्या जोमाने आणि स्पष्ट विकास आराखड्यासह पुन्हा जनतेसमोर उभे आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता, तसेच युवकांसाठी रोजगार व कौशल्यविकास या मूलभूत प्रश्नांवर ठोस व परिणामकारक उपाययोजना करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

“सामान्य माणसाचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून विकासाला नवी दिशा देणे हेच माझे ध्येय आहे,” असे भास्कर (आबा) बोंदर यांनी सांगितले.

त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे आणि व्यापक जनसंपर्कामुळे बेंबळी गटातील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा आणि उत्साह दिसून येत आहे. लवकरच मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधत विकास आराखडा सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या