खामसवाडी पंचायत समितीसाठी नरसिंग लोमटे यांची प्रबळ दावेदारी ; भाजपकडे उमेदवारीची जोरदार मागणी
नरसिंग लोमटे यांची प्रबळ दावेदारी ; भाजपकडे उमेदवारीची जोरदार मागणी
प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले असून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी जिल्हा परिषद गटातील खामसवाडी पंचायत समिती गणातून नरसिंग लोमटे यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची अधिकृत मागणी केली आहे.
नरसिंग लोमटे हे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मल्हारदादा पाटील यांचे खंदे समर्थक व निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तसेच भाजपा विद्यार्थी तालुका अध्यक्ष या जबाबदाऱ्या दीर्घकाळ यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी गावागावात सातत्याने काम केले आहे.
तसेच संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी सर्वसामान्य जनतेशी थेट नाळ जोडली आहे. युवक, विद्यार्थी, शेतकरी, विधवा, निराधार व अपंग घटकांसाठी त्यांनी वेळोवेळी केलेली मदत आजही माळकरंजा गणात चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा प्रभावीपणे मांडत राणादादा यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. खामसवाडी पंचायत समिती गणातील सर्वच गावांमध्ये ते “हक्काचा माणूस” म्हणून ओळखले जात असून त्यांच्या कार्याची जनतेमध्ये मोठी दखल घेतली जात आहे.
त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याच्या बळावर पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली असून, त्यांच्या दावेदारीमुळे इतर राजकीय पक्षांची गणिते मात्र बिघडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना, “लोमटे यांना उमेदवारी मिळाल्यास ते निश्चितच विजयश्री खेचून आणतील” असा विश्वास व्यक्त केला आहे.
नरसिंग लोमटे यांची उमेदवारी ही वैयक्तिक नसून सर्वसामान्य जनतेची उमेदवारी असल्याचे मत व्यक्त होत असून, आता भाजपाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळते का, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी मिळाल्यास खामसवाडी पंचायत समिती गणातील निवडणूक चुरशीची व अत्यंत लक्षवेधी ठरणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.


0 टिप्पण्या