भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती निमित्त राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप..
प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत धाराशिव शहर व परिसरातील विविध शाळांमधील 80 गरजू विद्यार्थ्यांना एक वर्ष पूरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.सदरील उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष,निवासी उप जिल्हाधिकारी शोभा जाधव,रूपामाता परिवाराचे संस्थापक व्यंकट गुंड इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या उपक्रमात नेहमी मदत करणारे आनंद समुद्रे,भाऊसाहेब धावारे,वैद्यकीय अधिकारी डॉ.मृणाल धावारे,सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी एन. बी.वाघमारे,सेवानिवृत्त राज्य परिवहन अधिकारी हर्षवर्धन बनसोडे,सेवानिवृत्त सहकार अधिकारी नितीन सोनवणे,जवळा येथील उपसरपंच बापूसाहेब धावारे,अविनाश वरवडकर, सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. सुधीर लोणे,डॉ.गणेश चव्हाण,मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य,अंकुश उबाळे,अरुण कांबळे,नामदेव कोळी,माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत,दलित मित्र शंकर खुणे,राजगीर संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे,राजगीर संस्थेच्या संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था उपाध्यक्ष रोहिदास झेंडे,सचिव धनंजय वाघमारे,संचालक राजेंद्र अंगरखे,रमेश कांबळे,अनुरथ नागटिळक,संपतराव शिंदे,राजेंद्र धावारे,बलभीम कांबळे,दिपक सरवदे,पांडुरंग आल्टे,सिद्धराम वाघमारे,भाऊसाहेब झेंडे,अशोक बोराडे,प्रकाश शिरसट,जनार्धन ठोकळ यांनी विशेष परिश्रम घेतले.शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे,महाराष्ट्र बँकेचे अधिकारी दिपक आदटराव,दिपक केंगार,संगीता शिंदे,मनिषा लोंढे,प्रा.आशाकांत भालेराव, वैभव चौधरी,कल्पना लोणे, यांचे सहकार्य लाभले.राजेंद्र अंगरखे सर यांनी सूत्रसंचलन केले.हा कार्यक्रम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत संपन्न झाला
0 टिप्पण्या