प्रतिनिधी....मनोज जाधव
तुळजापूर : तुळजापूर शहरात शिवसेनेच्या कार्याला नवे बळ देणारे मध्यवर्ती कार्यालय (दि.२०) रोजी भव्य दिव्य पद्धतीने सुरु करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.तसेच पालकमंत्री यांच्या सोबत उपनेते ज्ञानराज चौगुले,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते अनेक मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्साहात कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत थेट पक्ष कार्यालयात येऊन उद्घाटनासाठी उपस्थित राहणे.कार्यकर्त्यांच्या भावनेला ओळखून त्यांनी आपली जवळीक अधोरेखित केली.
हे मध्यवर्ती कार्यालय तालुकाध्यक्ष अमोल जाधव आणि शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरू करण्यात आले असून,या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाची समस्या ऐकून घेतली जाणार आहे,असे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात बोलताना सरनाईक म्हणाले, "शिवसेना ही केवळ राजकारणाची संघटना नसून ती कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. येथे उभे राहिलेले कार्यालय कार्यकर्त्यांसाठी उर्जास्त्रोत ठरेल याची मला खात्री आहे."
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते.शहरात मोठ्या प्रमाणात शिवसेना झेंडे,स्वागताचे फलक आणि पोस्टर लावून वातावरण शिवमय करण्यात आले होते.
या कार्यालयाच्या स्थापनेमुळे तुळजापूर परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक कामकाजाला निश्चितच गती मिळेल,असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मीनाताई सोमाजी,राधा घोगरे,रेणूका शिंदे,युवा सेना जिल्हाध्यक्ष गणेश जगताप,रमेश चिवचिवे,नितीन मस्के,भुजंग मुकेरकर युवा नेते सोमनाथ गुड्डे,शहाजी हक्के,स्वप्निल सुरवसे,अविनाश रसाळ,धर्मराज पवार,बाळासाहेब पुजारी,संजय लोंढे,संजय पेंदे,वल्लभ कदम,मोहन भोसले,संभाजी नेपते,चैतन जाधव तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या