शिवसेनेची आढावा बैठक संपन्न — स्वबळावर लढण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा निर्धार
प्रतिनिधी....मनोज जाधव
शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मराठवाडा सचिव मा. अशोक पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीस उपनेते ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, महिला जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी, तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे, शहर संघटक नितीन मस्के, तसेच अमरराजे परमेश्वर, गणेश पाटील, संजय लोंढे, रितेश जावळेकर, निखील अमृतराव यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटनात्मक बळकटीकरण, आगामी निवडणुकीची रणनिती आणि प्रचार आराखडा यावर सविस्तर चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवावी असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पक्ष आदेशानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. सर्व इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या धोरणांनुसार काम करावे. शिवसेना शिंदे गट ही जनतेच्या मनातील शिवसेना आहे. त्यामुळे प्रत्येकाने गावागावात पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हावे.”
बैठकीचा शेवट एकजुटीच्या घोषणा व जयघोषांनी झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट दमदार लढत देणार असल्याचा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


0 टिप्पण्या