रुग्ण सेवेत नायब तहसीलदार मनीषा कोळगे यांचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा
संध्याकाळी सात वाजता दिले रुग्णाला आवश्यक असणारे प्रमाणपत्र
तुळजापूर - कुटुंबातील व्यक्ती रुग्णालयात असणे ही वेळ कुठल्याही कुटुंबासाठी त्रासदायक असते त्यात दवाखान्यासाठी शासकीय कागदपत्रे गोळा करणे मोठे जिकिरीचे काम. सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव गेल्या अनेक वर्षांपासून हे जिकिरीचे काम रुग्णाच्या कुटुंबासाठी सोपे करून मोठी रुग्णसेवा करत आहेत त्यात त्यांना प्रशासनाची चांगली साथ मिळत असून तुळजापूरच्या नायब तहसीलदार मनीषा कोळगे यांनी महिनाभरात रुग्णासाठी २५ पेक्षा जास्त रेशन कार्ड अवघ्या काही मिनिटांत उपलब्ध करून दिल्याने रुग्णांना उपचार लवकर मिळण्यास मदत होत आहे.
सुटीच्या दिवशी दिले प्रमाणपत्र
तुळजापूर तालुक्यातील एका रुग्णाला ऑपरेशनसाठी तात्काळ रेशन कार्डची गरज होती. ही बाब रुग्णसेवक मनोज जाधव यांच्या सामाजिक कार्यकर्ते प्रजय पवार यांनी निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तत्काळ तुळजापूरच्या तहसीलदारांना विनंती केली. प्रशासनाची तत्परता दाखवत तहसीलदारांनी अवघ्या काही मिनिटांतच प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. नायब तहसीलदार यांना,बाळासाहेब यांची मोठी साथ लाभली.
या वेगवान निर्णयामुळे रुग्णाच्या उपचारात अडथळा न येता त्याला तातडीने मदत मिळाली. तहसीलदारांच्या या सेवाभावी कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, रुग्णसेवक मनोज जाधव यांनीही प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
याआधीही मनोज जाधव यांनी अनेक रुग्णांसाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे मिळवली आहेत. प्रशासन आणि समाजसेवक यांच्या सहकार्याने रुग्णसेवा अधिक वेगवान आणि परिणामकारक होत आहे, हे या घटनेने पुन्हा सिद्ध झाले आहे.
0 टिप्पण्या