Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स ( फूक ) सद्भावना मंचच्या वतीने संतोष देशमुख यांच्या प्रकरणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन..

फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स ( फूक )   सद्भावना मंचच्या वतीने संतोष देशमुख यांच्या प्रकरणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन..

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

धाराशिव :- आता तरी जागे व्हा फडणीस साहेब,यापुढे तुमचा कोणताही मंत्री गुन्हेगारांना पाठबळ देणार नाही,याची दक्षता घ्या  अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मस्साजोग घडेल,तसेच धनंजय मुंडेना सदरील सर्व गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी करा अशा प्रकारेचे लेखी निवेदन फुक संघटना व सद्भावना मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांना देण्यात आले.निवेदनात म्हण्टले आहे की,धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचे धाडस जमविण्यासाठी तुम्हाला तब्बल तीन महिन्याचा कालावधी लागला.यावरून तुमच्या सरकारचा आणि तुमच्या निर्णय क्षमतेचा कमकुवतपणा, सरकार टिकविण्यासाठी मित्र पक्षासमोर करावी लागणारी याचना,अगतिकता आणि लाचारी दिसून येते.हा राजीनामा आपण तीन महिन्यांपूर्वीच घेतला असता तर तुमच्या स्वच्छ, कार्यतत्पर, प्रामाणिक, धाडशी आणि भ्रष्टाचार-परांमुख सरकार चालविण्याची प्रचिती साऱ्या देशाला आली असती. परंतु तसे होणार नव्हते. धनंजय मुंडेंच्या विलंबित राजीनाम्यामुळे तुमच्या सरकारची, वैयक्तिक तुमची आणि अजित पवारांची प्रतिमा, मर्यादेपेक्षाही जास्त डागाळून गेली आहे.दि.९ डिसेंबर २४ रोजी मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. सदर हत्या वाल्मीक कराड व त्याच्या टोळीने घडवून आणल्याचे आणि कराड हा मुंडेंचा उजवा हात असल्याचे, त्याच दिवशी अख्या महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील सर्व लहान थोराना केवळ माहितीच झाले नाही तर खात्री झाली होती. परंतु तुमची आणि अजितराव पवारांची खात्री होण्यासाठी तब्बल तीन महिने लागले, याचे महाश्चर्य वाटते. आज मुंडेंचे चार्ज शीट मध्ये नाव येईपर्यंत तुम्हा दोघांनाही मुंडेंच्या निर्दोषपणाची खात्री वाटत होती, ही बाबच हास्यास्पद वाटते. विशेष म्हणजे कराडच्या टोळीने संतोष देशमुखांची केलेल्या निर्घुण हत्येचे फोटो आणि vdo तुमच्या पोलिसांकडे उपलब्ध होते, जे तुम्हीही पाहिलेले असणारच. " कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे आणि मुंडेंची काडीही कराडाविना हालत नाही " असे बोलतानाचा,मुंडेंची बहीण पंकजा मुंडेंचा vdo सुद्धा तुम्ही नक्कीच पाहिलेला असणार. त्यामुळे तुम्हा दोघा व्यतिरिक्त अख्खा महाराष्ट्र, मुंडेना पहिल्या दिवसापासून दोषी मानत होता. आणि म्हणूनच तो रस्त्यावर उतरला होता.
जनतेवर नाही तर किमान मुंडेंच्या रक्ताच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपावर तरी तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे होता. मुंडेंची सख्खी मामी सारंगी महाजन,बहीण मंत्री पंकजा मुंडे आणि सख्खी बायको सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंनी त्यांना कसे छळले ? कसे फसविले ? आणि कसे कुठे लुटले ? मुंडे कसे फ्रॉड वृत्तीचे आहेत ? याचे पुरावे vdo द्वारे तुम्हाला दिले होते. इतकेच नाही तर तुमची प्रत्यक्ष भेट घेऊन, मुंडेना मंत्रिपदावरून काढण्याची विनंती केली होती. रक्ताच्या नात्यावरही आपण विश्वास ठेवला नाहीत, व तीन महिने महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहिलात, याचे आश्चर्य वाटते.
महोदय, बिहारमध्येही मागील तीस वर्षापासून हेच घडत आले आहे. खून, बलात्कार सारखे कितीही मोठे आणि कितीही टोकाचे आरोप झाले तरी मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा नाही आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यायचाही नाही,अशी धोरणे तेथील सर्वपक्षीय नेत्यांनी मागील तीस वर्षापासून राबविले.त्यामुळे आज संपूर्ण भारत देशातच नव्हे तर आजुबाजूच्या देशातसुद्धा, त्या ठिकाणी घडलेल्या अराजकता, गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि अनैतिकतेच्या घटनांची तुलना,बिहार सोबत केली जाते.आज बिहार नंतर अशा उदाहरणांच्या लाईनमध्ये महाराष्ट्र उभा आहे,याची आम्हा महाराष्ट्रीयन नागरिकांना शरम वाटत आहे.आणि हे सर्व घडले आहे तुम्ही मुंडेंचा राजीनामा तीन महिन्यांपूर्वीच नाही घेतल्यामुळे.७० हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप असलेल्या अजित पवारांना पक्षामध्ये घेतल्यामुळे तुमचा पक्ष अगोदरच पुरता बदनाम झाला आहे.त्या अजितरावांच्या मंत्र्याला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न तुम्ही केल्यामुळे, तुमच्या पक्षाची आणि सरकारची पुरती बदनामी, आज संपूर्ण देशभर झाली आहे.मंत्री मुंडेंचा दबाव असतानाही सदर गुन्ह्याचे प्रबळ पुराव्यानिशी आरोपपत्र आपण दाखल केल्याबद्दल आम्ही आमच्या खालील संघटनांच्या वतीने, फडणीस सरकारचे अभिनंदनच करतो. तद्वतच मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अक्षम्य विलंब केल्याबद्दल, आणि धादांत पुरावे असूनही धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यासाठी उशीर केल्याबद्दल आणि त्यांना गुन्ह्यामध्ये आरोपी नाही केल्याबद्दल, तसेच कृष्णा आंधळे या फरार आरोपीला अटक करण्यासाठी अक्षम्य विलंब होत असल्याबद्दल, आम्ही सरकारचा निषेधही करतो.त्याचबरोबर आम्ही मागणी करतो की, सदर प्रकरणातील सर्व आरोपी आणि संशयित आरोपी, यांचे मागील सहा महिन्याचे CDR रेकॉर्ड त्वरित काढून सुरक्षित ठेवावेत. आजपर्यंत हे रेकॉर्ड काढले नसल्यामुळे सरकारच्या नियतीबद्दल शंका उपस्थित होत आहेत. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पडण्यासाठी १० लाखाचे बक्षीस जाहीर करावे. मुंडे यांच्या सातपुडा या सरकारी बंगल्यातील cctv चे मागील सहा महिन्याचे vdo रेकॉर्ड त्वरित काढून सुरक्षित करावेत. २ कोटी खंडणीच्या मागणीची बैठक सातपुडा बंगल्यावरच पार पडल्याचा आरोप, सुरेश धस यांनी पुराव्यानिशी केला आहे. सातपुडा बंगल्यावरील Cctv पुरावे आणि वाल्मीक सोबतचे मुंडे यांचे शेकडो vdo च्या आधारे, धनंजय मुंडे यांना खुनाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी करावे.त्याचप्रमाणे इथून पुढे महाराष्ट्र मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे किंवा इतर आरोप झाल्यास, त्याची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी. अजित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे,आरोप सिद्ध होण्याची किंवा पुरावे शोधण्याची कारणे सांगून, कलंकित मंत्र्याचा राजीनामा घेण्याचे टाळू नये, जेणे करून यापुढेतरी महाराष्ट्राची देशभरात होणारी बदनामी, तसेच बिहार राज्यासोबत होणारी तुलना टाळली जाईल. आणि महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले भ्रष्टाचार, खून, बलात्कार आणि गुंडगिरीचे थैमान रोखले जाईल.अशा प्रकारचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले,यावेळी धर्मवीर कदम,सिजोद्दीन शेख,गणेश वाघमारे,विजय गायकवाड,दादासाहेब जेटीथोर, सिद्दिकी मोईनोद्दिन,यू.व्हि.माने,अय्याज सिद्दीकी,अरफात काझी सह इतर फुक संघटना व सद्भावना मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या