यशराज पब्लिक स्कुल धाराशिवचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...
मुख्य संपादक..मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- यशराज पब्लिक स्कुल धाराशिवचे वार्षिक स्नेहसंमेलन छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पडले,माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन आणि भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले, मान्यवरांचे स्वागत शाल बुके व फुलांचे वृक्ष देऊन करण्यात आले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांचे हस्ते करण्यात आला तर कार्यक्रमाची सुरुवात देवा श्री गणेशा या गाण्याने झाली.संस्थेच्या अध्यक्षा तथा प्रिन्सिपॉल रेखा जेवळीकर व जेवळीकर सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, युवराज नळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना भारतीय संविधान विषयी माहिती देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.पालक,शाळेतील शिक्षक,कर्मचारी,आया मावशी,स्कुल बस ड्रायव्हर अन्य इतरांना सन्मानित करण्यात आले,महाराष्ट्र किक बाॅक्सिंग स्पर्धा सन २०२५ मधील शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल,एक सिल्व्हर, ब्राँझ मेडल जिंकले,विजयी विद्यार्थ्याचे व प्रशिक्षक ओमकार झाल्टे,शेख शरीफ यांचा सत्कार करण्यात आला.तर पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले प्रा.सोमनाध लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या.यावेळी साहित्यिक युवराज नळे,श्री साई श्रद्धा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सोमनाथ लांडगे,सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे,कवी युसुफ सय्यद,अॅड.नामदेव तेरकर,पोलीस निरीक्षक हिना शेख,अॅड.जयश्री तेरकर,मीना महामुनी,मनिषा राखुंडे पाटील,गायकवाड मॅडम,आदिती जोशी पल्लवी सुरवसे,मेघा सलगर ,प्रणिता गरड,प्राची खेर्डेकर, सुभद्रा गायकवाड,स्नेहा भुतेकर, सुनंदा बंडगर,मेघा मेटकरी, जयवंत ओमने,बालाजी गरड सह इतर उपस्थित होते, प्रस्तावना प्रा.रेखाताई जेवळीकर यांनी केले तर सुत्रसंचलन आदिती जोशी यांनी तर आभार प्रा.रेखाताई जेवळीकर यांनी मानले.
0 टिप्पण्या