प्रतिनिधी ....मनोज जाधव
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यसह शेजारील राज्य कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा व मध्य प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापुरात येऊन आपला कुलधर्म व कुलाचार पार पाडत असतात ...
मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आव्हान....
तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की कोरोना रोगाचा नवीन व्हेरियंट महाराष्ट्रात जोराने वाढत असून यासाठी आपण दर्शनाला येताना सोशल डिस्टन्स तसेच मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करावा असे आव्हान मंदिर प्रशासनाच्या वतीने पत्रक काढून भाविकांना करण्यात आले असून या निर्णयाला मंदिर प्रशासनातील सर्व पुजाऱ्यांनी सहकार्य करावे असेही आव्हान मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे...



0 टिप्पण्या