प्रतिनिधी....मनोज जाधव
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मराठा आरक्षण मोर्चात सहभाग
मराठा समाजाच्या आंदोलनाला राजकीय बळ
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विराट मोर्चात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून लाखो मराठा समाजबांधवांचा जनसागर उसळला आहे.
या आंदोलनाला राजकीय स्तरावरही मोठा पाठिंबा मिळू लागला असून बीड जिल्ह्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः हजेरी लावून मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला की, “मी आपल्या आंदोलनात पूर्णपणे सहभागी असून, मराठा समाजाच्या हक्कासाठी नेहमीच खांद्याला खांदा लावून उभा राहीन.”
क्षीरसागर यांनी केवळ उपस्थितीच दर्शवली नाही तर प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होऊन मुंबईच्या दिशेने चालत जाणारी ऐतिहासिक वाटचालही सुरू केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील इतर आमदार आणि खासदारांना देखील सकल मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी व्हावे लागेल, अशी चर्चाही रंगली आहे.
मोर्चात क्षीरसागर यांच्या उपस्थितीचे समाजात मोठे स्वागत झाले. यावेळी मराठा तरुणांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोषात घोषणाबाजी केली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो" अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले
.
सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार संदीप क्षीरसागर यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करण्यात आले असून, हा आंदोलनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0 टिप्पण्या