प्रतिनिधी....मनोज जाधव
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना, कृषीमंत्री मात्र विधानसभेत मोबाईलवर रम्मी खेळण्यात गर्क असल्याचा गंभीर आरोप करत राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची जोरदार मागणी केली आहे.
विधानसभेच्या चालू अधिवेशनात एखाद्याचे राडेबाजी, एखाद्याचे जुगार आणि आता कृषी मंत्र्याचे मोबाईलवर रम्मी खेळणे हे सगळं राज्याच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिली.
> "देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक कृषीमंत्री झाले, पण कोकाटे यांच्यासारखा नालायक मंत्री या राज्याने कधीच पाहिला नाही," असे म्हणत त्यांनी कोकाटे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
राज्यात दररोज किमान ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत, आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. तरीसुद्धा सरकारच्या कोणत्याही पातळीवर गांभीर्य दिसून येत नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात एकेक करून असे शेतकरीविरोधी आणि भंपक मंत्री भरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजाभाऊ राऊत म्हणाले की, "कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होते. पण मंत्र्यांकडे जुगार खेळायला पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला नाही! हेच या सरकारचे आणि कृषी मंत्र्याचे वास्तव आहे."
शिवाय, त्यांनी वसंतराव नाईक यांचा दाखला देत म्हटलं की, "ते मंत्री असताना चांगला पाऊस पडला की पेढे वाटायचे, आणि आता मंत्री जुगारात गुंतलेले आहेत. हे दुर्दैव नव्हे तर महाराष्ट्रासाठी शाप आहे."
“कृषी खात्याच्या निधीचा वापर कोणी बाईच्या नाचावर, तर कोणी मोबाईल रम्मीत करत आहे — हे शेतकऱ्यांच्या रक्ताचं शोषण नाही तर काय?”
अशा मंत्रीमंडळाचा निषेध करत राजाभाऊ राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलं, “या मंत्र्याला तात्काळ पदावरून हटवा व घरी बसवा!” अशी तीव्र मागणी करून, त्यांनी मंत्र्यांविरोधात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
0 टिप्पण्या