Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन*








 *शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन*      

                               धाराशिव दि 31(प्रतिनिधी) मनोज जाधव 

शिक्षण महर्षी  सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या सन 2026 वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी  ( दि.30)रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (देवगिरी प्रांत) प्रदेशाध्यक्ष  मा. प्रा. श्री  सचिन कंदले  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शहरातील पोलिस लाईन समोरील संस्थेच्या  कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अभाविप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. डॉ. हंसराज उर्फ सारंग जोशी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (देवगिरी प्रांत) प्रदेश संघटन मंत्री सिध्देश्वर लटपटे प्रा. गोपाळ धोंड (बीड) धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक, जीवनमूल्य व्यसनमुक्ती निसर्गोपचार केंद्र धाराशिव संचालक ब्रम्हाकुमार सुरेशभाई जगदाळे, अभाविप जिल्हा विस्तारक अजय टोले,श्री साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक  प्राचार्य  सोमनाथ लांडगे, दैनिक एकमतचे पत्रकार सुभाष कदम-पाटील, वाडी बामणी येथील तुळजाई . विदयालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव, वाडी बामणी वि. का. से. सो. माजी चेअरमन बाळसाहेब नरवडे,  प्रा. जाधव सर, डॉ वसंत मुंडे, महादेव सुर्यवंशी, भाजपा युवा नेते अनिकेत कोळगे  यांची उपस्थिती होती.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी  उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवजित तीर्थकर, श्रीकांत शेरखाने, विश्वजीत पारदे, शंकर कोळगे, इम्रान पठाण, रत्नदीप मडके, विकास कदम, कृष्णा कुलकर्णी, प्रथमेश गुंड, काकासाहेब माने यांच्यासह संस्थेचे संचालक तेजसिंह कोळगे, व्यवस्थापक शाम गंगावणे, कर्मचारी वैशाली जोशी, मंगल राठोड, श्रीकांत काशिद सभासद, हितचितक  यांची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या