प्रतिनिधी ....मनोज जाधव
तुळजापूर पंचायत समिती मध्ये नव्याने रुजू झालेले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री भंगरदिवे यांचा शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीने करण्यात आला सत्कार...
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पंचायत समिती येथे आज नव्याने रुजू झालेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री भंगरदिवे यांनी पदभार स्वीकारताच शिवसेना शिंदे गटाचे तुळजापूर तालुकाप्रमुख श्री अमोल जाधव व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या वेळी त्यांचा सोबत शहर प्रमुख बापूसाहेब भोसले शेतकरी सेना प्रमुख गणेश नेपते,मोहन भोसले,प्रशांत मस्के,राजाभाऊ जाधव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते...
यावेळी जाधव यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या काळात काम करत असताना आपल्याला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या पक्षाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्यांनीही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात आम्ही आपली मदत व सहकार्य घेऊन तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास करून एक जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात नाव उज्वल करू असे यावेळी त्यांना आश्वासित केले
0 टिप्पण्या