स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!
बेंबळी जिल्हा परिषद गटात रुईभर चे कै. शिवाजी निंबाळकर यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर निंबाळकर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष यांच्या नावाची सर्वत्र होत आहे चर्चा
धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून, राजकीय वातावरणाला चांगलीच उष्णता आली आहे.
जिल्हा परिषद बेंबळी गटाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष म्हणून जाहीर झाल्याने अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर रुईभर येथील कै. शिवाजी बापु निंबाळकर यांचे चिरंजीव तसेच सामाजिक व युवक कार्यात अग्रेसर असलेले ज्ञानेश्वर निंबाळकर यांचे नाव गटात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे. ज्ञानेश्वर निंबाळकर हे गेल्या काही वर्षांपासून बेंबळी परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि युवकवर्गाशी संबंधित विविध उपक्रमांमधून सक्रिय आहेत.
त्यांच्या संयमी नेतृत्वशैलीमुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळे स्थानिक मतदारांमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, बेंबळी गटात ज्ञानेश्वर निंबाळकर हे तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून उभे राहू शकतात. त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा वाढत असून, आगामी निवडणुकीत या गटात चुरस निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
बेंबळी परिसरात सध्या सर्वत्र एकच चर्चा —
ज्ञानेश्वर निंबाळकर मैदानात उतरणार का, बेंबळी गटाला त्यांच्या रूपाने एक युवा जिल्हा परिषद सदस्य मिळणार का?


0 टिप्पण्या