Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

“एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय मिळायलाच हवा!” — रमण आगळे पाटलांची राजकीय भूमिका चर्चेत! पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढविण्यास तयार..


 “एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय मिळायलाच हवा!” — रमण आगळे पाटलांची राजकीय भूमिका चर्चेत!

      पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढविण्यास तयार....


      प्रतिनिधी....मनोज जाधव 


आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीनंतर धाराशिव तालुक्यातील चिखली पंचायत समिती गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या गणाचे आरक्षण ओबीसी पुरुष यासाठी सुटल्याने अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.



या पार्श्वभूमीवर मेडसिंगा गावचे भूमिपुत्र व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले रमण दादा आगळे पाटील यांनी “सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज” शी बोलताना सांगितले —



> “जर पक्षाने आदेश दिला, तर चिखली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यास मी पूर्णपणे तयार आहे. पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे.”





रमण आगळे पाटील हे आजवर पक्षनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यक्षम कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी इमानदारीने पार पाडली असून, त्यांचे वडील जीवन दिगंबर आगळे व आजोबा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिगंबर रंगनाथ आगळे हेही डॉ. पदमसिंह पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. पक्षाशी असलेली ही नाळ आणि सातत्यपूर्ण एकनिष्ठता हीच त्यांची जमेची बाजू ठरत आहे.



स्थानिक कार्यकर्त्यांच्या चर्चेनुसार, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास रमण दादा आगळे यांच्यावर असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे.


रमण आगळे पुढे म्हणाले —


> “मी पक्षाचा सैनिक आहे. आजवर पक्षाशी निष्ठा राखली आणि जबाबदारीने काम केले आहे. भविष्यातही पक्षाच्या विचारधारेसाठी तत्पर राहीन. पक्ष नक्कीच माझ्यावर विश्वास दाखवेल अशी मला खात्री आहे.”




📍 चिखली पंचायत समिती गण आता या घोषणेमुळे राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरला असून, आगामी निवडणुकीत नव्या समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत.



---


---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या