बरमगाव बू येथील अंगणवाडी मध्ये बालदिन उत्साहात साजरा
मुख्य संपादक...मनोज जाधव
प्रतिनिधी...अमर आगळे
तालुक्यातील बरमगाव बुद्रुक येथे अंगणवाडी क्रमांक येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला
प्रथमता लहान मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर लहान मुलांचे विविध प्रकारचे खेळ गाणी व इतर कार्यक्रम घेण्यात आले
गावातील ग्राम समृद्धी संस्थेचे अध्यक्ष अमर आगळे यांनी लहान मुलांसाठी खाऊ व खेळाचे साहित्य आणले होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून व केक कापून बालदिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमासाठी अंगणवाडी च्या मॅडम श्रीमती सुनंदा ढवळे, श्रीमती चैताली कांबळे, श्रीमती सुमेधा ढवळे,श्रीमती पूजा आगळे यांनी पथक परिश्रम घेतले
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचे सांगता झाली


0 टिप्पण्या