Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रुईभरची अभिमानाची बातमी! जयप्रकाश विद्यालयाच्या दोन तेजस्वी विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड

 

      

         रुईभरची अभिमानाची बातमी!

जयप्रकाश विद्यालयाच्या दोन तेजस्वी विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड


रुईभर (प्रतिनिधी) : मनोज जाधव 

शैक्षणिक गुणवत्तेला आणि लेखनकलेला लाभलेले सुवर्ण यश! जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड झाली असून या यशाचा भव्य सत्कार सोहळा शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.


महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तीगृहांमधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाज कल्याण कार्यालय, धाराशिव यांनी ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध रितीने पार पाडली.


या स्पर्धेत कुमारी पारवे सिद्धी कोंडीबा (इ.10वी) हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले तर कुमारी सोनटक्के श्रावणी गुणवंत (इ.10वी) हिने तृतीय क्रमांक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. रुईभर येथील जिजामाता मुलींच्या वस्तीगृहात राहून अभ्यासात आणि निबंधलेखनात प्रचंड आवड निर्माण करत त्यांनी हे यश मिळवले. वस्तीगृहाच्या अधीक्षक श्रीमती सरिता भोयटे यांनी दिलेले मार्गदर्शन उल्लेखनीय ठरले.


संविधान स्वीकृतीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शासकीय वस्तीगृह व निवासी शाळांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश्य या स्पर्धेमागे होता.


यशस्वी विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या प्रसंगी अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे, माजी जि.प. सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्रा.प. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, स्वामी समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश शेटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत कोळगे यांनी केले.


— रुईभर गावातील कन्यांची राज्यस्तरीय यशाकडे वाटचाल; गावाचा नावलौकिक आणखी उज्वल!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या