भाग...१
येडशी रामलिंग अभयारण्यात वाघाचा सलग तीन महिने अंधाधुंद धुमाकूळ – वनविभागाकडून तातडीने कारवाईची मागणी
प्रतिनिधी.....शहाजी आगळे
धाराशिव: मागील दोन महिन्यांपासून येडशी रामलिंगाटा अभयारण्यात एक वाघ धुमाकूळ घालत असून, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. या वाघाने अनेक जनावरे फस्त केली असून, काही ठिकाणी माणसांवरही हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, वनविभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
या परिस्थितीमुळे संतप्त झालेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी वनविभागाला धारेवर धरत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर लवकरच हा वाघ जेरबंद केला गेला नाही, तर वनाधिकाऱ्यांना कागदी वाघ भेट म्हणून देण्यात येईल. तसेच, जर यानंतरही वनविभागाने दुर्लक्ष केले, तर थेट वनमंत्र्यांनाच ‘गाढव भेट’ दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
येडशी रामलिंग अभयारण्य परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरत आहे, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे. गावकऱ्यांनी वारंवार वनविभागाकडे मदतीची मागणी केली असली तरी, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
वनविभागाची भूमिका आणि पुढील पावले
या वाघाच्या वाढत्या दहशतीमुळे वनविभागावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी "लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल" असे आश्वासन दिले असले, तरी नागरिकांना प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा आहे. विशेषतः सामाजिक कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यामुळे प्रशासन अधिक सतर्क होण्याची शक्यता आहे.
वनमंत्र्यांना 'गाढव भेट' – प्रतीकात्मक आंदोलन?
नागरिक व कार्यकर्त्यांची मागणी – तातडीने कारवाई करा!
संपूर्ण परिसरातील नागरिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते वनविभागाकडून तातडीने उपाययोजनांची मागणी करत आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या पद्धतींचा अवलंब करून नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, हीच स्थानिकांची प्रमुख मागणी आहे. आता वनविभाग आणि प्रशासन या परिस्थितीवर कसा प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या