Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिर संपन्न


 रक्तदान करणे हे जीवन वाचवण्याचे कार्य आहे - प्राचार्य जयप्रकाश कोळगे    

       रुईभर : -दि 8 ऑक्टोबर रोजी - मानव जीवन हे एकमेकांच्या सहकार्याने आनंदी करता येते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे सर्वांमध्ये गुण असणे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे एकमेकांना काही ना काही आपण दान देत असतो. त्यात रक्तदान करणे आवश्यक आहे. समाजातील अनेक लोक आजाराने ग्रासलेले आहेत. त्यांना रक्ताची आवश्यकता असते. आपण रक्तदान शिबिरातून रक्तदान दिले तर अशा आजारी लोकांचा जीव वाचवू शकतो. म्हणून रक्तदान करणे हे जीवन वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करावे अशी अपेक्षा जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य जयप्रकाश कोळगे बोलत होते.

       ते पुढे म्हणाले की मी स्वतः 45  वेळा रक्तदान केले आहे. जीवनामध्ये 100 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प आहे. प्रत्येकानी समाजासाठी काही ना काही दान करण्याची इच्छा ठेवली पाहिजे.

      हे रक्तदान शिबिर शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव यांच्यामार्फत आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.     

      रक्तदान शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सर्व टीम उपस्थित होती. यामध्ये दीपमाला कारंडे ( रक्त संक्रमण अधिकारी ) , श्री मुंडे नरसिंग ( नर्सिंग ऑफिसर ) , गणेश साळुंखे (वैद्यकीय समाजसेवक ) , पवार साहेब (वाहन चालक ) , विद्यार्थ्यात काळे चिन्मय, वैष्णवी गायधनकर यांनी सहकार्य केले.

         याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या