📰 धाराशिव तालुक्यात तत्पर प्रशासनाचे उत्तम उदाहरण!
अवघ्या पाच मिनिटांत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिले फार्मर आयडी मंजुरी
धाराशिव (प्रतिनिधी): मनोज जाधव.....
धाराशिव तहसील कार्यालयात प्रशासनिक चपळाईचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले आहे. धाराशिव तहसीलच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी शेतकरी सूर्याजी धुमाळ रुईभर व पुनम विनोद लांडगे (मेडशिंगा) यांच्या ॲग्री-स्टॅग अर्थात फार्मर आयडी ला अवघ्या पाच मिनिटांत मंजुरी देत कार्यतत्परतेची नवी उंची गाठली आहे.
माहितीनुसार, सदर शेतकऱ्यांचे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन पेंडिंग असल्याची माहिती शेतकरी पुत्र व सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांना मिळताच त्यांनी तहसीलदार डॉ. जाधव यांना दूरध्वनीद्वारे अडचण कळविली. नगरपालिकेच्या निवडणूक कामकाजात अत्यंत व्यस्त असतानाही त्यांनी तात्काळ लक्ष देत पाच मिनिटांत दोन्ही आयडी मंजूर केले.
तहसीलदार मॅडम गेल्या पंधरा दिवसांपासून झिरो पेंडन्सी अभियानांतर्गत काम करत असून “तालुक्यातील कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये” ही जबाबदारी त्यांनी आपल्या कार्यशैलीतून सिद्ध केली आहे. त्यांच्या या त्वरित निर्णयामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला असून समाधानाचा सूर शेतकरीवर्गातून उमटत आहे.
या कार्यात तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील नायब तहसीलदार यांचे अखंड सहकार्य लाभत असल्याचे दिसून येत आहे. दिवस-रात्र तहसीलदारांच्या आदेशाने कार्यरत असलेले अधिकारी प्रशासनाचा सकारात्मक चेहरा अधिक उजळवत आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा देणारे, जलद व संवेदनशील प्रशासन – धाराशिव तहसील कार्यालय!



0 टिप्पण्या