मुले हिच राष्ट्राची खरी संपत्ती आहे - प्राचार्य जयप्रकाश कोळगे
रुईभर :-दि 14 नोव्हेंबर रोजी आपल्या आई - वडिलांनी केलेले संस्कार जीवनात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. संस्काराशिवाय चांगले काम आपण करू शकत नाही. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून चांगले जे घेण्यासारखे आहे ते घेत राहून संस्कारी बनले पाहिजे. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुले आवडत. ते असे म्हणत की लहान मुले राष्ट्राचे भविष्य असतात. लहान वयातच चांगले वळण लागले तर चांगले काम होते. मुले चांगली घडली पाहिजेत कारण हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे.विद्यार्थी सुसंस्कारी असतील तर उत्कृष्ट राष्ट्राची निर्मिती होईल. असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरा करताना प्राचार्य जयप्रकाश कोळगे बोलत होते.
याप्रसंगी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले. लहान मुलांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबाची फुले देऊन सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे तर आभार प्रा गणेश शेटे यांनी केले.


0 टिप्पण्या