चिवरी पंचायत समिती गणातून मालोजी मुसळे यांना हिरवा कंदील, निवडणुक लढवणार?
प्रतिनिधी....मनोज जाधव
तुळजापूर :- चिवरी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी मालोजी मुसळे यांचे नाव समोर येत आहे. मुसळे गेल्या १० वर्षांपासून आजतागायत युवासेना शाखाप्रमुख गंधोरा, शिवसेना जिल्हापरिषद गटप्रमुख अणदूर, युवासेना उपतालुका प्रमुख तुळजापूर, यां सारख्या विविध पदांवर त्यांनी काम केले असून सध्या ते आयटी सेल अधिकारी तुळजापूर या पदावर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी, शांत संयमी, मनमिळाऊ स्वभाव असल्याने सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पंचक्रोशीत नाव कमावले आहे. ज्याचा ठसा चांगलाच उमटला आहे.
आगामी पंचायत समिती निवडणुका समोर येताच तुळजापूर तालुक्यातील चिवरी मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून, या मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मालोजी संभाजी मुसळे हे प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत.
मालोजी मुसळे हे एकनिष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुळजापूर तालुक्यात प्रसिद्ध आहेत. ते खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे निकटवर्ती सहकारी असून, पक्षाशी अखंड निष्ठा आणि कार्यक्षमतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मानाचा दर्जा आहे.
मुसळे यांनी "फुल ना फुलाची पाकळी" खारू ताईचा वाटा म्हणून सामाजिक, शैक्षणिक, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या आहेत. गंधोरा - चिवरी परिसरातील युवकांमध्ये मुसळे यांचे मोठे आकर्षण आहे. अनेकांच्या अडचणी त्यांनी एका कॉलवर सॉल केल्या आहेत.
महाविकास आघाडीतून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून मुसळे यांना उमेदवारी मिळाल्यास, चिवरी मतदारसंघात विजयाची मजबूत लाट निर्माण होईल, असा विश्वास स्थानिक शिवसैनिक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.


0 टिप्पण्या