प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर : -दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी - भारत संचार निगम लिमिटेड (बी एस एन एल, ही भारताची प्रचलित दूरभाषा सेवा आहे. यांच्याकडुन अगदी दुर्मिळ भागापर्यंत सेवा दिली जाते. डोंगराळ भागात ही यांचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यात सातत्य आहे त्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड हिने सर्व जनतेचा विश्वास जोपासला आहे असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे बीएसएनएल रोप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे विद्यालयात चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याचा बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रस्ताविक भाषणात बोलत होते. ते पुढे म्हणाले की आपल्या भागात प्रथम परळी येथे टावर उभारून सेवा देण्यास सुरुवात केली. आज त्याचे विस्तृत रूप पाहतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते.
विद्यालयातील एकूण 80 विद्यार्थी स्पर्धेसाठी बसले होते. त्यातून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक काढले. त्यात प्रथम प्रतीक्षा कोळगे हिस सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व 1100 रुपये रोख, द्वितीय शहजाद शेख यालाही सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व 700 रुपये रोख, तृतीय अक्षरा माने याही विद्यार्थिनीला सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र 500 रुपये रोख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. बाकी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
बीएसएनएल धाराशिव चे जिल्हाप्रमुख ए ए शेख यांनी ही मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्रामीण भागात शाळा असूनही विद्यार्थ्यांनी बीएसएनएल या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सुद्धा गुणवत्ता दाखवली आहे. प्रारंभी पासून बीएसएनएलने उत्तरोत्तर प्रगती करून लोकांची सेवा केली आहे. ग्रामीण भागात ही सेवा देण्याचे काम केले आहे. राष्ट्र निर्माण करण्यासाठी बीएसएनएलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारताची सुरक्षा यंत्रणा जोडण्याचे काम फक्त बीएसएनएलने केले आहे. ग्रामीण व शहरी भागाला जोडण्याचे काम केले आहे. आपण स्पर्धा घेण्यासाठीची परवानगी देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता हेही कार्य कमी लेखून चालणार नाही. उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य ' राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , एन जे सूर्यवंशी ( उपजिल्हाप्रमुख धाराशिव ), विनायक चव्हाण (नोडल ऑफिसर ), मिलिंद गवळी (एफ टी टी एच ) , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शेटे यांनी तर आभार काकासाहेब डोंगरे यांनी केले.


0 टिप्पण्या