---
प्रतिनिधी...मनोज जाधव
नोकरीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात वास्तव पण मूळ गाव देगलूर...
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मूळ रहिवासी व सध्या धाराशिव जिल्ह्यात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दांपत्य दीप्ती महेश देवणीकर व महेश अंबादासराव देवणीकर यांच्या कन्या मधुरा दीप्ती महेश देवणीकर हिने शिक्षणक्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मधुराची निवड बीड येथील नामांकित आदित्य डेंटल कॉलेज या दंतशास्त्र महाविद्यालयात झाली असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आई वडिलांचे संस्कार ठरले महत्वाचे...
आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाच्या बळावर मधुराने हे यश संपादन केले. समाजात कार्यरत असलेल्या पालकांच्या प्रामाणिक कामाचा वारसा तिने आपल्या प्रयत्नांतून जपला आहे.
मेडसिंगा गावची अनोखी परंपरा
मेडशिंगा गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवेत असताना दीप्ती देवणीकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे गावकऱ्यांच्या मनात या दांपत्याबद्दल विशेष आपुलकी निर्माण झाली आहे. याच भावनेतून गावातील नवयुवकांनी पुढाकार घेत मधुराचा तिच्या घरी जाऊन उत्स्फूर्त सत्कार केला. या सत्कारातून गावकऱ्यांनी तरुणाईसमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
मधुराच्या यशामुळे देवणीकर कुटुंबीयांचा सन्मान तर झाला आहेच, शिवाय या उत्स्फूर्त सत्कारामुळे तिच्या मेहनतीला व कौतुकाला एक वेगळीच झळाळी मिळाली आहे. गावकऱ्यांच्या या उपक्रमामुळे तरुण पिढीला नवीन दिशा मिळून प्रेरणा घेण्यास नक्कीच हातभार लागेल.
आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची नेहमी जाणीव ठेवा...मधुरा
यावेळी बोलताना मधुराने सांगितले की आपण जो माझा मान सन्मान केला आहे त्यामुळे मी भारावून तर गेली आहेच परंतु येणाऱ्या काळात माझे शिक्षण पूर्ण करून मी तळागाळातील गोरगरीब लोकांची सेवा करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार असून आपल्या या सत्कारामुळे मला त्या गोष्टीचा कधीच विसर पडणार नाही आपल्या या सत्कारामुळे आज मला एक नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली असून तरुणांनी पण या गोष्टीपासून आदर्श घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला यश नक्कीच मिळते असेही तिने यावेळी सांगितले...
सत्कारासाठी मेडशिंगा येथील शिवसेना पक्षाचे सोशल मीडियाचे तालुकाप्रमुख किशोर साळुंखे,रमाकांत जाधव,विनोद आगळे,रमेश माने,उद्धव घाडगे,महादेव कचरे यांच्यासह गावातील नागरिक हजर होते...
---




0 टिप्पण्या