वंदेमातरम् हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्रोत आहे - प्राचार्य जयप्रकाश कोळगे
रुईभर : - दि ७ नोव्हेंबर रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात वंदे मातरम् गीताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वंदे मातरम् या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले आहेत. भारताचे राष्ट्रीय गीत 7 नोव्हेंबर 1875 मध्ये बंकिम चंद्र चटोपाध्याय यांनी लिहिले आहे. भारतीयांमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती भावना निर्माण करण्यासाठी वंदे मातरम् गीताचे महत्वाचे योगदान आहे. 1896 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत सर्वप्रथम गायले गेले. हे गीत स्वातंत्र्य च्या लढाईमध्ये लोकांना प्रेरणा स्तोत्र होते. भारतीयांना एक सूत्रतेत बांधण्यासाठी या गीताला महत्त्व आहे. म्हणून वंदे मातरम् हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे असे प्रतिपादन जयप्रकाश माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे वंदे मातरम् दिन साजरा करताना प्राचार्य श्री जयप्रकाश कोळगे बोलत होते.
याप्रसंगी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते. प्रमुख अतिथी म्हणून रुईभर बीटचे केंद्रप्रमुख श्री केदार दुधंबे साहेब उपस्थित होते. यांनीही वंदे मातरम् गीताचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या प्रसंगी जागतिक विद्यार्थी दिन ही साजरी करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा प्रशांत कोळगे यांनी केले.


0 टिप्पण्या