प्रतिनिधी....मनोज जाधव
📰 मुंबई कधीच थांबत नाही... पण मराठा आरक्षणासाठी थांबली!
मुबई...
"मुंबई कधीच थांबत नाही" असं नेहमी म्हटलं जातं, पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तब्बल चार कोटी मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्याने आज इतिहास घडला.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या आंदोलनात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गावागावातील लोकांनी आपली पारंपारिक वाद्ये घेऊन मुंबईत हजेरी लावली. भगव्याच्या गजरात मुंबई भगवेमय झाली. पारंपरिक कला, ढोल-ताशांचा निनाद आणि झेंड्यांच्या लाटांनी संपूर्ण मुंबई दुमदुमली.
या प्रचंड गर्दीमुळे रेल्वे स्टेशन, मंत्रालय, मुंबई महानगरपालिका, तसेच उपनगरे येथील वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली. जिथे "मुंबई थांबत नाही" अशी ओळख होती, तिथे आज मराठा जनसागरामुळे मुंबई थांबलीच नव्हे तर मराठा इतिहासाने नवा अध्याय रचला.
विशेष म्हणजे, गावखेड्यातून आलेल्या बांधवांच्या स्वागताला मुंबईकरांनी दिलदार मनाने साथ दिली. त्यांच्या उत्साहाला, कला-संस्कृतीला दाद देत त्यांनी खऱ्या अर्थाने बंधुत्वाचे दर्शन घडवले.
आजचा दिवस मुंबईकरांच्या स्मरणात कायम राहील, कारण इतिहासात पहिल्यांदाच मुंबई थांबली... आणि ती थांबली मराठा आरक्षणासाठी!
0 टिप्पण्या