Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव चे सुपुत्र व हॉटेल वाडा चे मालक आणि त्यांची टीम करणार उद्या आझाद मैदानावर अन्नदान.... धाराशिवच्या सुपुत्रांकडून मराठा आंदोलनात होणार मोठे अन्नदान!



       प्रतिनिधी....मनोज जाधव 


 धाराशिव चे सुपुत्र व हॉटेल वाडा चे मालक आणि त्यांची टीम करणार उद्या आझाद मैदानावर अन्नदान....


धाराशिवच्या सुपुत्रांकडून मराठा आंदोलनात होणार मोठे अन्नदान!


      माझा बांधव उपाशी असताना मी स्वस्थ कसा बसू...


धाराशिव जिल्ह्यातील तडवळा गावचे सुपुत्र असून सध्या पुणे येथे हॉटेल वाडा या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केलेले सारिका शेजाळ,गणेश जमाले, रोहित जमाले व त्यांच्या संपूर्ण टीमने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला थेट अन्नदानाच्या माध्यमातून मोठा हातभार लावण्याचा संकल्प केला असून त्यांची मदत सोमवारी सकाळी आझाद मैदानावर होणार पोहोच....


पुण्यात व्यवसायात स्थिरावल्यानंतरही आपल्या जन्मभूमीविषयी असलेले प्रेम आणि जिव्हाळ्याची ओढ त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती आणि हे त्यांनी कृतीतून दाखविण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील लाखो बांधव आंदोलनात सहभागी असल्याचे लक्षात घेऊन उपासमारीची समस्या कमी व्हावी या हेतूने त्यांनी अन्नदानाची जबाबदारी उचलली.


याअंतर्गत आंदोलनस्थळी १००० किलो मसालेभात, ५००० पाण्याच्या बाटल्या आणि तब्बल १०,००० चपाती यांचे वाटप सोमवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यात सारिका शेजाळ, संकेत वर्पे, अनिल शेजाळ, सीए सुनील शेजाळ, विजय इंगोले,डॉक्टर अभिजित पाटील,अविनाश सावंत आदींनीही झोकून देऊन सहभाग घेतला.


हॉटेल वाडा उद्योगसमूह व मित्रपरिवाराच्या या सेवाभावी उपक्रमामुळे आंदोलनात सहभागी धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवांमध्ये एक प्रकारचे समाधान व दिलासा निर्माण झाला आहे. तसेच धाराशिवबाहेर स्थायिक असलेल्या व्यावसायिकांनाही समाजकारणासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


👉 "लढा गरजंत मराठ्यांचा – एक मराठा लाख मराठा!" या घोषणेप्रमाणे समाजासाठी झटणाऱ्या या अन्नसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या