Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मेडसिंगा ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा — मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील!


 

         प्रतिनिधी.....मनोज जाधव 

📰 मेडसिंगा ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा — मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील!

धाराशिव :
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज दादा जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्राद्वारे इशारा दिला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवेदनात म्हटले आहे की,
“गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. यासाठी सध्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या मागण्या आमच्या पाठीशी आहेत. सततच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे उशीर न लावता सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस आपण आणि आपले सरकार जबाबदार असेल.”

या ठिकाणी ग्रामपंचायतीचा शिक्का मारलेले अधिकृत पत्र थेट मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आले आहे.
यामुळे आता सरकारला ग्रामपंचायतींपासून गावकऱ्यांपर्यंत निर्माण झालेल्या संतापाची जाणीव होईल का? हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

👉 मराठा समाजाच्या लढ्याला गावागावातून उठणारा हा इशारा सरकारला जाग आणणारा ठरणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या