प्रतिनिधी....मनोज जाधव
📰 धाराशिवहून सरकारला धडकी – चिखली ग्रामसभेचा ठराव मंजूर!
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटला असून, आता ग्रामपंचायती देखील सरकारला थेट इशारे देऊ लागल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील चिखली ग्रामपंचायतीने एकमताने ठराव मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ शिंदे यांना थेट धडक दिली आहे.
या ठरावातून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण निर्णायक टप्प्यात आलेले असताना आता गावागावातून सरकारविरोधात ठराव मंजूर होऊ लागल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार हे स्पष्ट झाले आहे.
👉 चिखली ग्रामसभेचा ठराव हा फक्त सुरुवात असून, एकापाठोपाठ संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून अशा प्रकारचे ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.
✍️ "आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ग्रामपंचायतींचा दबाव वाढत राहणार," असा सूर स्थानिकांमध्ये उमटताना दिसतो.


0 टिप्पण्या