Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

करजखेडा गावाची मराठा आंदोलनाला भक्कम साथ – ‘एक घर, एक शिदोरी’ उपक्रमातून रसद पुरवठ्याचा निर्धार


 

      प्रतिनिधी....मनोज जाधव 

📰 करजखेडा गावाची मराठा आंदोलनाला भक्कम साथ – ‘एक घर, एक शिदोरी’ उपक्रमातून रसद पुरवठ्याचा निर्धार

धाराशिव :
मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा गावाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. “एक घर, एक शिदोरी” या घोषणेतून संपूर्ण गावाने आंदोलनकर्त्यांना रसद पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.



या शिदोरीत किमान १० भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी व लोणचं यांचा समावेश असेल. प्रत्येक कुटुंब आपल्या घरातून दोन दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून आणणार असून ती सर्व रसद श्री खंडोबा मंदिर, करजखेडा (जुने गाव) येथे जमा केली जाणार आहे. यासाठी दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वा. वेळ निश्चित करण्यात आली आहे.



करजखेडा ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पसरत असून, आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गावोगावून अशा प्रकारचे निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

👉 करजखेडा गावाचा ‘एक घर, एक शिदोरी’ उपक्रम आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या