Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सचिव पदी एडवोकेट अजय वाघाळे यांची नियुक्ती


 


      प्रतिनिधी....मनोज जाधव 


📰 धाराशिव जिल्हा सचिव पदी अॅड. अजय शिवाजी वाघाळे यांची निवड

धाराशिव :
सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तर्फे धाराशिव जिल्हा सचिवपदी अॅड. अजय शिवाजी वाघाळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा नियुक्तीपत्र परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शुभांगी ताई काळभोर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले.

अॅड. वाघाळे यांचा कार्यकाळ दिनांक ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार असून, साहित्य परिषदेचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवून सुशिक्षित व सुजाण समाजनिर्मितीसाठी ते अविरतपणे कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



आपल्या कार्यातून साहित्यसृष्टीला नवे आयाम मिळावेत व समाजातील सकारात्मक विचारांची पेरणी व्हावी, अशी शुभेच्छा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अॅड. अजय वाघाळे यांना विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या