प्रतिनिधी....मनोज जाधव
📰 शिवणी जामगा लोहा तालुका येथे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
लोहा (जि. नांदेड) :
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवणी जामगा गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गावाजवळील पुलावरून पाणी गेल्याने शेतकरी सुनिल दामोदर जामगे यांच्या म्हशी वाहून गेल्या असून संपूर्ण उभे पिक पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे.
अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे जनावरांसह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने आयुष्यभराची बचत करून जनावरे व शेती उभी केली होती; मात्र एका रात्रीत सर्व काही उद्ध्वस्त झाले.
यामुळे गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी जामगे यांना झालेल्या या मोठ्या नुकसानीची शासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी केली आहे.


0 टिप्पण्या