प्रतिनिधी....मनोज जाधव
✒️ भाईचाऱ्याचे अनोखे दर्शन : बलसूरकर मराठा आरक्षण मोर्चासाठी रवाना
बलसूर (ता. उमरगा):
मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आजाद मैदान येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी बलसूरकर उत्साहात रवाना झाले. या वेळी बलसूर मुस्लिम बांधव व राहत चॅरिटेबल ट्रस्ट उमरगा यांच्या वतीने यात्रेकरूंना पाणी वाटप करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
समाजातील भाईचारा व ऐक्याचे अनोखे दर्शन या प्रसंगी सर्वांच्या डोळ्यात भरले. आरक्षणाच्या लढ्यात एकीचे सामर्थ्य किती मोठे आहे याचे प्रत्यंतर येथे मिळाले.
या प्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यनारायण जाधव, ग्रामपंचायत उपसरपंच अय्यूब पटेल, सदस्य पवन पाटील, तसेच सुधीर नांगरें, चंद्रकांत भोसले, सुरेश साळुंखे, अलीम आत्तार, नासिर आत्तार, जाकिर आत्तार, मन्सूर शेख, आयूब आत्तार, सैपन फकीर, अल्ताफ शेख, मुबारक शेख, दास्तगीर शेख, बिलाल शेख, शरीफ शेख आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भाईचाऱ्याच्या या पावलाने डोळ्यात अंजन घालणारा संदेश दिला आहे.
0 टिप्पण्या