Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन



      प्रतिनिधी....मनोज जाधव 


 ☀️ *ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन* ☀️

|| जनतेच्या सेवेसाठी प्रतिष्ठान कटिबद्ध ||


 *युवा नेते श्री.ओंकार दत्तात्रय आगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक २६/०८/२०२५ रोजी शाही थाटात करण्यात आले.* 

उद्घाटनाची पूजा चेअरमन श्री महादेव लाकाळ यांच्या हस्ते केली. नारळ श्री काकाजी आगळे पोलीस पाटील यांच्या हस्ते फोडले. उद्घाटनाची रिबीन माजी नायब तहसीलदार श्री महादेव आप्पा पाटील यांच्या हस्ते कापली. तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन श्री निवृत्ती बापू लाकाळ यांनी केले. ओंकार आगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. 

*यावेळी गावांतर्गत ज्या ज्या पोल वर बल्ब नसेल त्या त्या ठिकाणी बल्ब बसवण्याची व्यवस्था ओंकार कडून करण्यात आली.*

 असे बल्ब बसवण्यासाठी अविनाश जाधव यांच्याकडे तंटामुक्त अध्यक्ष रावण शित्रे व उपाध्यक्ष दिलीप घेवारे यांच्या हस्ते बल्प देण्यात आले. केक कापून फटाके फोडून ओंकारचा वाढदिवस साजरा केला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, तर अनेकांनी सत्कारही केला. *या सत्काराला उत्तर देताना माझे प्रतिष्ठान सदैव जनसेवेसाठी कटिबद्ध राहील आमच्याकडून प्रत्येकालाच साथ सहकार्य केले जाईल असे वचन दिले.*

 माजी सैनिक रामराव राऊत यांनीही मनोगत व्यक्त करत असताना ग्रामपंचायत कडून होत असलेल्या गैरसोयी बद्दल खंत व्यक्त केली. 

*मेडसिंगा पॅटर्नचे जनक श्री. दत्ता बाबा आगळे यांनी सांगितले की जनतेच्या वैयक्तिक, सार्वजनिक, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी भेटण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय होय. निराधार, लाडक्या बहिणी, शेतकरी, नोंदीत कामगार, शाळकरी विद्यार्थी, बाल विकास इत्यादी घटकांना वैयक्तिक लाभ, विविध सहकारी योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. ग्रामपंचायतीकडून होत असलेली जनतेची हेळसांड दूर करून कामे करण्यास भाग पाडणे. सरकारी कर्मचारी यांना सतर्क राहण्यास भाग पाडणे इत्यादी व अनेक कामे या प्रतिष्ठान कडून केली जातील. यासाठी जनतेत आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन केले.*


यावेळी माजी सरपंच संगीता आगळे, सोसायटी सदस्य नागनाथ पडवळ, ग्रामपंचायत सदस्य पती दादाराव कांबळे, ज्ञानदेव पडवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन राऊत, बाळासाहेब रणदिवे, वसंत पाटील, संभाजी फरताडे, सुदर्शन पडवळ, दत्ता शेलार, बालाजी वाघमारे, श्रीनिवास जाधव, लखन लाकाळ, माणिक पडवळ, अजय भोजगुडे, विलास खिल्लारे, विश्वास शित्रे, समाधान भोरे, संतोष रणदिवे, अंकुश लाकाळ, महेश घेवारे, दादा साठे, अनिल फरताडे, दादा लांडगे, युवराज पडवळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.

या वेळी सर्व उपस्थितांना अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुक्राचार्य शेलार यांनी केले तर सुदर्शन आगळे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली तर प्रतिष्ठान चे कामकाज सुरू झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या